नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात इथल्या गांधीनगर इथं आयोजित तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरान्सिंगद्वारे संबोधित केलं.
शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि सरकारचं धोरण यामुळे विविध अन्नधान्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे,असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. अन्नप्रक्रिया क्षेत्रात 100 टक्के परदेशी भेट गुंतवणूक, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यामातून मूल्यसाखळी आणि मूल्यवर्धन, अशी अनेक पावलं सरकारनं या क्षेत्राला चालना देण्यासाठी उचलली आहेत,असं त्यांनी सांगितलं.