नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी ट्रम्प सध्या तिथे गेले आहेत. त्या ठिकाणी ही त्यांची पाहिलीच भेट आहे.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची ट्रम्प यांची भेट घेतली. तालिबानला वाटाघाटी करायच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानाल्या अमेरिकी सैन्यात कपात करण्याची इच्छा आहे, असं ट्रम्प म्हणाले.