नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केलं. संपूर्ण भारतातून पोलीस अधिक्षक आणि संचालक पदावरील पोलीस अधिकारी या वार्षिक परिषदेला उपस्थित आहेत.
गृह मंत्रालय,पोलीस संशोधन आणि विकास विभाग आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय संस्था, सी.बी.आय. केंद्रीय राखीव पोलीस दल आदींची देखील या परिषदेला उपस्थिती आहे.