नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्दान यांना ८२ टक्के मतं मिळाली. परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस ७१ टक्के मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मतदानाची अंतिम फेरी उद्या होणार असून त्यात दोनच उमेदवार असतील. निवडणुकीचा अंतिम निकाल येत्या ५ सप्टेंबरला अधिकृतपणे जाहीर होईल.