नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजेच १८५७ च्या उठावातले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे हे अतुलनीय शौर्य आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असून त्यांच्या देशभक्तीच्या भावनेनं कित्येकांना प्रेरित केलं आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.