मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मध्य रेल्वेच्या परेल इथल्या लोको कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीच्या नॅरो गेज इंजिनाची निर्मिती केली आहे. यूनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या हिमालयाच्या कुशीतल्या  कालका ते  सिमला या रेल्वे मार्गावर हे इंजिन धावणार आहे.

या इंजिनाची निर्मिती करताना इथल्या कर्मचाऱ्यांनी कोविड  विषयक सर्व नियमांचं पालन करून ते वेळेत पूर्ण केलं आहे. अतिशय थंडीतही सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीनं या छोटेखानी इंजिनाची रचना केली आहे. याशिवाय आपातकालीन ब्रेक, दक्षता नियंत्रण उपकरण आणि इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर ही या इंजिनाची वैशिष्टयं आहेत.