मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टी आणि पुरामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी जवळपास २ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असं जाहीर केलं होते.
त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल. बहुवार्षिक पिकांचं किमान ३३ टक्के नुकसान झालं आहे, अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या जिरायत आणि आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दरानं २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे.