नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बचतीला प्रोत्साहन देणारा नाही, अशी टीका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले, की या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावामुळे आयकर विवरणपत्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. एलआयसी अर्थात, आयुर्विमा महामंडळ आणि एअर इंडिया विकण्याच्या सरकारच्या योजनेबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.