नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक चित्रपट क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार आज अमेरिकेतल्या लॉस एंजलीस मध्ये प्रदान करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह एकुण चार पुरस्कार पटकावले आहेत.
जोकर सिनेमातल्या जुआस्विन याला सर्वोकृष्ट अभिनेता तर जूडी या चित्रपटासाठी रिनी ज्वेलगर हिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. टॉय स्टोरी .फोर या चित्रपटाला सर्वोकृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोकृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार बग जून हु याने पॅरासाइट या चित्रपटासाठी पटकावला. पॅरासाइट या चित्रपटाने सर्वोकृष्ट सिनेमा आणि सर्वोकृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट अशा दोन्ही श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले. सर्वोकृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार रॉजर डिफिन्स याला नाईटीन सेंव्हटिन या चित्रपटासाठी मिळाला.
हॉलिवूडचा प्रतिथयश अभिनेता ब्रॅड पिट याला वन्स अपॉन अ टाईम या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला त्याचा हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे.