????????????????????????????????????

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ध्यात हिंगणघाट इथे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ४०% भाजलेल्या या तरुणीवर नागपूरमध्ये उपचार सुरु होते.

आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेनंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्य सरकारनं या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली आहे.