नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ‘कोविड-19 महामारी काळात विचार आणि ध्यान यांचं महत्व’ या निवृत्तीवेतन धारकांसाठी आयोजित चर्चासत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते.

कोविड-19 महामारीकाळात निवृत्तीवेतनधारक हा सर्वात असुरक्षित गट होता, त्यांना वैद्यकीय मदती इतकीच त्यांच्या अडचणी ऐकून घेणाऱ्या व्यक्तीची गरज होती आणि त्यामुळेच असे कार्यक्रम त्यांना स्वतःच्या शारिरीक आरोग्याची काळजी घेताना येणारा मानसिक ताण कमी करण्यासही मदत करतात, असं ते म्हणाले.