मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

एअर मार्शल पांडुरंग नारायण प्रधान यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. एअर मार्शल पांडुरंग नारायण प्रधान यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत अनुज्ञेय असलेले 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 2 लाख रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

ले. जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. ले. जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत अनुज्ञेय असलेले रुपये 2,04,000/- अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के म्हणजे रुपये 1,53,000/- शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के म्हणजेच रुपये 51,000/- मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

ले. कर्नल नितिन शिवाजीराव भिकाने यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार मेन्शन इन डिस्पॅच पदक प्रदान करण्यात आले आहे. ले. कर्नल नितिन शिवाजीराव भिकाने यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले रुपये 2,75,000/- अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के म्हणजे रुपये 2,06,250/-शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के म्हणजेच रुपये 68,750/- मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.