नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी फेब्रुवारीत चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पाच भारतीय महिला मुष्टीयोद्ध्या पात्र ठरल्या आहेत. नवी दिल्लीत झालेल्या या पात्रता स्पर्धेसाठीच्या चाचणी स्पर्धेत मेरी कोमनं ५१ किलो वजनी गटात बहुचर्चित लढतीत निखत झरीनला ९-१ असं नमवलं.
५७ किलो वजनी गटात साक्षी चौधरीनं सोनिया लाथेरला, तर ६० किलो वजनी गटात सिमरनजीत कौरनं माजी विश्वविजेत्या सरिता देवीला पराभूत केलं. ६९ आणि ७५ किलो वजनी गटात लोवलिना बारेगोहेन आणि पूजा रानी विजेत्या ठरल्या आहेत. या दोघींना आपापल्या गटात एकमतानं निर्णय घेऊन विजेत्या ठरल्यानं त्यांनीही भारतीय संघात आपलं नाव निश्चित केलं आहे.
या भारतीय महिला मुष्टीयोद्ध्या स्पर्धेच्या एकूण सहा प्रकारात लढत देणार आहेत. चीनमध्ये होणाऱ्या या पात्रता स्पर्धेचा अडथळा पार केला तरच त्या टोकियो इथं होणार्याप ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.