नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी आणि त्यांच्या अमोघ कार्यायासाठी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

भारतीय चित्रपट आणि चित्रपट सृष्टीतल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं भारतीय चित्रपटाचे जनक धुंडीराजा गोविंद फाळके यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो. सुवर्ण कमळ आणि दहा लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.