मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं साडेतीन कोटीचा टप्पा पार केला असून, अशी कामगिरी करणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. राज्यात काल ३ हजार ६३६ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ६ लाख ३५ हजार ३९० लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ५४ लाख ४५ हजार २४३ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लशीची मात्रा दिली आहे.