मुंबई : देशातील सर्वात विश्वासू सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक युनियन बॅँक ऑफ इंडियाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईत आयोजित एका व्हर्चुअल कार्यक्रमात १०२ वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने बँकेने प्री-अप्रूव्ह्ड युनियन डिजि पर्सनल लोन, युनियन डिजि डॉक्स आणि स्ट्रेट थ्रू प्रोसेस ही तीन विशेष उत्पादने लाँच केली.
युनियन बँक ऑफ इंडियाची स्थापना १९१९ मध्ये झाली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी याच्या पहिल्या प्रमुख कार्यालयाचे उद्घाटन केले होते. युनियन बँकेने स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतर भारताचे बँकिंगची स्थिती बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. देशातील आर्थिक वृद्धीतही आता बँकेचे मोठे योगदान आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने उद्योग, आणि निर्यात, कृषी, प्रसार, पायाभूत सुविधा आणि इतर विशिष्ट व्यापार श्रेणींसारख्या क्षेत्रातही कर्जाचा विस्तार केला. युनियन बँक ऑफ इंडियाचे काम आता संपूर्ण भारतात ९,५०० पेक्षा जास्त शाखांमध्ये विस्तारलेले आहे. बँकेच्या ग्राहकांची संख्या १२० दशलक्षांपेक्षा जास्त आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय यांनी १०२ व्या स्थापना दिवस प्रसंगी सर्व युनियनचे सदस्य आणि ग्राहकांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येकाच्या प्रयत्नांसाठी कौतुक केले. खरोखरच आपल्या सर्वांसाठीदेखील बँकेचा १०२ व्या स्थापना दिवस हा अभिमानाचा प्रसंग आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.