Bengaluru: A medic collects samples for COVID-19 tests at a road side free clinic, as coronavirus cases surge across the country, in Bengaluru, Monday, Aug. 31, 2020. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI31-08-2020_000125B)

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ४७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईला कोरोनामुक्तीचा दर ९१ टक्क्यावर स्थिर आहे.

मुंबईत काल ५४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ६५४ झाली आहे. काल दिवसभरात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १० हजार ५९६ झाली आहे.

सध्या मुंबईत ८ हजार ९४६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान मुंबईतला कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९७ दिवसांवर पोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.