मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत काल १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या वाढत आहे. काल रुग्णसंख्या १७५ वर पोचली. सध्या १ हजार १८४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४९० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ हजार १२१ वर पोचली आहे सध्या ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २२६ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.
परभणी जिल्ह्यात काल १२, तर आतापर्यंत ६ हजार ५६६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. काल आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ६ हजार ९४३ वर गेली आहे. सध्या ९३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारामुळे २८१ रुग्णांचा बळी गेला आहे.
जालना जिल्ह्यात काल ८८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. आतापर्यंत ११ हजार ५३ रुग्णांना घरी पाठवलं आहे. काल ७५ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्णांचा आकडा ११ हजार ८४८ वर पोचला आहे. सध्या ४९० रुग्ण उपचारांधीन आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काल चार तर आतापर्यंत ३१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत काल दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण रुग्ण संख्या तीन हजार २८१ वर गेली आहे. सध्या १९ रुग्ण उपचार घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात काल ८६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ६५४ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल २२२ बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या ४९ हजार २९७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६५९ रुग्णांनी या आजारामुळे आपला प्राण गमावला आहे.
जळगाव जिल्ह्यात काल ५२, तर आतापर्यंत ५२ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ६० नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा ५३ हजार ९५१ वर पोचली आहे. सध्या ३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ८४ झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार २४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १ हजार १२८ जणांचा मृत्यू झाले असून, सध्या ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.