नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातलं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर पोचलं आहे. सध्या बाधित रुग्णांची एकूण संख्या ९० लाख ४ हजार ३६६ वर पोचली आहे.

सध्या देशात ४ लाख ४३ हजार ७९४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. देशभरात काल ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता १ लाख ३२ हजार १६२ झाली आहेत.

दरम्यान, १९ नोव्हेंबरपर्यंत देशात १२ कोटी ९५ लाख ९१ हजार ७८६ नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १० लाख ८३ हजार ३९७ नमुने काल तपासण्यात आले. सणासुदीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्यानं कोरोना संसर्गाचं प्रमाण देशात पुन्हा काहीसं वाढल्याचं दिसून आलं आहे.