नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ९१ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात काल दिवसभरात ४४ हजार ५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ९१ लाख ३९ हजार ८६५वर पोचली आहे.

देशभरात काल ४१ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८५ लाख ६२ हजार ६४१ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर ९३ पुर्णांक ६८ शतांश टक्क्यावर पोचला आहे.

देशभरात काल ५११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ७३८ झाली आहे. सध्या देशातल्या कोरोना मृत्यूदर १ पुर्णांक ४६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे. सध्या देशभरात ४ लाख ४३ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान देशभरात आत्तापर्यंत १३ कोटी २५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने दिली आहे.