मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर संक्तवसुली संचालनालयानं छापे घातले. याशिवाय सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही छापे घातल्याचं वृत्त आहे. संचालनालयानं दहा ठिकाणी छापे घातले अशी प्राथमिक माहिती असल्याचं यासंदर्भातल्या बातमीत म्हटलं आहे.
या छाप्यांमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान या छापेसत्रानंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. आमदार सरनाईक शिवसेनेचे प्रवक्ते आणि बांधकाम व्यावसायिक आहेत, सध्या ते देशाबाहेर आहेत.