मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. पाच दिवसांपूर्वी ३०० दिवसांवर झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५८ दिवसांवर आला आहे. अजून १५ दिवस रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल मुंबईत कोरोनाचे ९३९ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ७७ हजार ४४६ वर गेली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, सध्या १० हजार ६६६ रूग्ण उपचार घेत आहेत.
काल एकूण १९ जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला.