नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २३४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ७ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठीच्या ६० कोटी ८७ लाख रुपये निधीचाही समावेश आहे.

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली काल आंतरमंत्रालयीन मान्यता समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. यामध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत कृषीआधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत मिळालेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.

या योजनांसाठी १७३ कोटी ८१ लाख रुपये गुंतवणूक करण्यात आली असून यामध्ये ७ हजार ७५० लोकांना रोजगार मिळणार आहे.