मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसंच इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात काल २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस टाटा मोटर्सने बनवलेल्या आहेत.

याबाबतची आरटीओ पासिंगची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील. आतापर्यंत बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या ६ आणि भाडेतत्त्वावरच्या ६६ अशा एकूण ७२ बसेस असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ३४० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी २६ बसेस काल दाखल झाल्या आहेत. या बसेसना चार्जिंग करावे लागणार आहे. त्यासाठी सध्या बॅकबे आणि वरळी बस आगारात चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत.