मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही. नेमकं काय झाले ते तपासून पाहावे लागेल. आम्ही पालिकेच्या कायद्यांनुसार कारवाई केली आहे. याबाबत आम्ही कायदे विभागाचा सल्ला घेऊ. असही त्यांनी म्हटलं आहे.