नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड-१९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६९ शतांश टक्के इतका असून, काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४१ हजार ४५२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८७ लाख ५९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात ४ लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत, ४१ हजार ३२२ नव्या रुग्णांची भर पडली असून, एकूण बधितांची संख्या ९३ लाख ५१ हजारांवर पोहोचली आहे.

भारतातील कोविड मृत्यूदर १ पूर्णांक ४६ शतांश टक्के असा आहे. काल सकाळी ४८५ मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार २०० रुग्ण दगावले आहेत.