नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या 24 तासांत देशभरात नोंदविल्या गेलेल्या 496 मृत्यूंपैकी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत झाले असून त्यांचा एकूण 70.97% हिस्सा आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी सर्वाधिक मृत्यू दिल्लीत झाले असून त्यांची संख्या 89 इतकी नोंदविली गेली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रात 88 मृत्यू झाले असून पश्चिम बंगालमध्ये 52 मृतांची नोंद झाली.
पुढील आकडेवारी नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन मृतांची संख्या दर्शवित आहे.
22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
सध्या सक्रीय रुग्णसंख्या 4,53,956 इतकी आहे.भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 4.83% इतके आहे.
गेल्या 24 तासांत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील सक्रीय रुग्णसंख्येतील बदल खालील आकडेवारीत दिला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे नव्या 1940 रुग्णांची नोंद झाली तर दिल्लीत 1603 रुग्ण आढळून आले असून कालच्या तुलनेत घट झालेली दिसून आली.
देशात गेल्या 24 तासांत एकूण 41,810 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.
दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी 70.43% रूग्ण केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरीयाणा,आणि छत्तीसगढ या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळ नव्या रूग्णसंख्येच्याबाबत आघाडीवर असून एकूण रुग्णसंख्या 6,250 आहे. महाराष्ट्रात 5,965 रुग्णांची नोंद झाली तर त्याखालोखाल दिल्लीत 4,998 नवे रूग्ण आढळून आले.
बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 88 लाखांचा आकडा ( 8,802,267) पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 93.71% इतका आहे.
गेल्या 24 तासांत देशात 42,298 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
नव्या रुग्णांपैकी 68.73% रूग्ण 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक रूग्ण बरे झाले असून त्यांची संख्या 6,512 इतकी आहे. केरळमध्ये 5,275 रूग्ण बरे झाले असून त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,937 रूग्ण बरे झाले आहेत.