????????????????????????????????????

एपीआय इंटिग्रेशन सक्षम केले

मुंबई : भारतीय रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्टएपीआयच्या माध्यमातून एपीआय एकत्रिकरण सुरु केले आहे. फ्री-टू-इंडिटग्रेट फीचरद्वारे स्टार्टअप्स आणि स्टॉक सल्ल्यासह कोणताही प्लॅटफॉर्म एंजल ब्रोकिंगद्वारे रिअल-टाइम ट्रेड्स करण्यासाठी उपलब्ध होईल. तसेच अल्गो ट्रेडर्सना ५ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये त्यांचे प्रोग्राम डिप्लॉय करता येतील.

सध्या हा प्लॅटफॉर्म पायथॉन, नॉज, जावा, आर, गो या भाषांना सपोर्ट करतो. स्मार्ट एपीआयने २.८३ दशलक्ष एंजल ब्रोकिंग ग्राहकांसाठी (ऑक्टोबर २०२०पर्यंत) एंड टू एंड ट्रेडिंग सेवा विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. वरीलपैकी कोणत्याही भाषेत अल्गोरिदम तयार करण्याची इच्छा असलेले एंजल ब्रोकिंगचे ग्राहक स्मार्ट एपीआयच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात खात्यात ऑर्डरवर अंमलबजावणी करू शखतील. उदा. ग्राहकांना सामारे जाणारे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आता एंजल ब्रोकिंग प्लॅटफॉर्ममध्ये एकिकृत होऊ शकतात. याद्वारे या ब्रोकिंग फर्मच्या माध्यमातून ग्राहकांना अखंडपणे ट्रेड्सची सेवा देऊ शकतात.

एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, ‘तंत्रज्ञानप्रणित नूतनाविष्कारांमध्ये एंजल ब्रोकिंग नेहमीच अग्रेसर असते. स्मार्ट एपीआय आपल्या यूझर्सना मजबूत प्लॅटफॉर्म तयार करण्यास मदत करते, अखंडपणे अल्गो ट्रेडिंग करण्यासही सक्षम करते. एवढेच नाही तर, ग्राहकांच्या उद्देशाने अल्ट्रामॉडर्न सेवेच्या पुढील लाटेचेही स्वागत करते. हा प्लॅटफॉर्म अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजला सपोर्ट करेल आणि नजीकच्या भविष्यात त्यात आणखी भर घालण्याच्या दिशेने काम करेल अशी आशा आहे.’

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी म्हणाले ‘ग्राहकांना हा प्लॅटफॉर्म स्कोपच्या बाबतीत उपयुक्त वाटेल तसेच नफा आणि उत्कृष्ट यूझर अनुभवाच्या बाबतीतही तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा आम्हाला विश्वास आहे. हा प्लॅटफॉर्म ग्राहकांना अनेक कोडिंग भाषेत एपीआय प्रदान करतो, यासोबतच, आमच्या तज्ञांच्या पॅनलमार्फत त्यांचे प्रश्न सोडवण्यासही मदत करतो.’