मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक न्यायप्रणाली वापरून सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. कुलाबाला यांनी दिली. इस्लामपूर येथील सहकार न्यायालयाचं उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार अपील न्यायालयाचे अध्यक्ष जी.ए. सानप उपस्थित होते. इस्लामपूर येथील न्यायालयाच्या कक्षेत वाळवा, शिराळा, पलूस आणि कडेगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे. या न्यायालया मुळे सांगली इथल्या  सहकार न्यायालया वरील कामकाजाचा भार कमी होणार आहे.