नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतील शरयू नदीत लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार आहे. केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत काल याबाबत जलमार्ग मंत्रालयाची बैठक झाली.रामचरित मानस यात्रा असं नाव असलेल्या या १५ किलोमीटरच्या क्रूज यात्रेदरम्यान शरयू तीरावरील प्रसिद्ध ठिकाणं पाहता येतील. तसंच अयोध्येत शरयू नदीकाठी होणाऱ्या आरती सोहोळ्यातही क्रूजवरील प्रत्येक प्रवासी सहभागी होऊ शकेल. रामायणावर आधारित काही सेल्फी पॉइंटसुद्धा या यात्रेत असतील. प्रवाशांच्या सोईसुविधा आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करुन या क्रूजची रचना करण्यात आली आहे.