नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लद्दाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली.
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल आर के एस भदोरिया आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग ही बैठकीत सहभागी झाले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनबद्दलच्या भविष्यातल्या धोरणांविषयी बैठकीत चर्चा झाली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याने आक्रमक कारवाया केल्यास प्रतिकार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सेनादलांना देण्यात आलं आहे. चीन बरोबरच्या जमिनीवरच्या आणि सागरी सरहद्द क्षेत्रात कडक पहारा ठेवावा, असं सैन्यप्रमुखांना सांगण्यात आलं.