नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं  केलं आहे. सुधारित कृषी कायद्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, केंद्र सरकारनं आज दुपारी  शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात  बैठक घेतली.

केंद्र सरकारकडून या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पियुष गोयल उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, आंदोलनाच्या मार्गाचा त्याग करुन, चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन तोमर यांनी केलं. या बैठकीला  ३२ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या ३ डिसेंबरला चर्चेची पुढची फेरी होणार आहे.