पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 8  हजार  165  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 38 हजार 267  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 45 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 44 हजार 740  रुग्णांपैकी 3  लाख 24 हजार 958 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11  हजार 443  आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 339  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.26 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 369 रुग्णांपैकी 48 हजार 870  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  775 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 182  रुग्णांपैकी 42 हजार 522  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 52 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 608  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 878  रुग्णांपैकी 44 हजार 758  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 420 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 98 रुग्णांपैकी 47  हजार 57 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  355 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 327  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 913, सातारा जिल्ह्यात 144, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 56  तर कोल्हापूर जिल्ह्यात 16  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 484 रुग्णांमध्ये  पुणे जिल्हयात 970, सातारा जिल्हयामध्ये 177, सोलापूर जिल्हयामध्ये 226, सांगली जिल्हयामध्ये 74 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 37 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 99  हजार 195 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला.  प्राप्त अहवालांपैकी 5 लाख  38 हजार 267  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 ( टिप :- दि.  2 डिसेंबर 2020 रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )