मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा, पायथा विजगृह प्रकल्प, पाणी वाटप नियोजन, पाणीसाठा किती दिवस पुरेल तसंच धरण परिचालन सूची यांची माहिती घेतली. त्याआधी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पोफळी इथल्या कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पाचा चौथ्या टप्प्याची पाहणी केली. यावेळी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, परिवहन मंत्री ऍड.अनिल परब, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी मान्यवर तसंच संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.