मुंबई: आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स इनेबलर शॉपमॅटिकने अत्यंत नावीन्यपूर्ण सोल्युशन्स लाँच केल्याची घोषणा केली. याद्वारे ई-कॉमर्सची पद्धतच क्रांतिकारकरित्या बदलेल. वैयक्तिक उद्योजक आणि व्यावसायिक आता ४ प्रकारच्या ई-कॉमर्स सोल्युशन्सद्वारे निवड करू शकतात. त्यात चॅट सेलिंग, सोशल सेलिंग, मार्केटप्लेस सेलिंग आणि वेब स्टोअर्सद्वारे सेलिंग यांचा समावेश आहे. ग्राहक त्यांच्या गरजांनुसार यापैकी कोणताही एक मार्ग निवडू शकतील.

या क्षेत्रातील असा पहिलाच प्रयोग असून शॉपमॅटिकद्वारे विक्रेत्यांना विविध ई-कॉमर्स सोल्युशन्सद्वारे ऑनलाइन विक्रीसाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. शॉपमॅटिक प्लॅटफॉर्मच्या आधीच्या किंमतीतच हे सर्व पर्याय उपलब्ध असतील. लाखो विक्रेते सध्या चॅट (व्हॉट्सअप, टेलिग्राम, लाइन इत्यादी) किंवा सोशल (फेसबुक, इन्स्टाग्राम, इत्यादी) पोर्टलवर विक्री करण्यास पसंती देत आहेत. शॉपमॅटिकने आता चॅट आणि सोशल विक्रेत्यांना एकच नावीन्यपूर्ण चेकआउट लिंक प्रदान करत त्यांना अधिक सक्षम केले आहे. या चॅनेलमध्येच ते विक्री पूर्ण करू शकतील.

शॉपमॅटिकचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री अनुराग अवुला म्हणाले, “ नव्या सोल्युशनद्वारे, ई कॉमर्स इकोसिस्टिममधील लाखो विक्रेत्यांना नव्या बाजारपेठेत उतरवताना आम्ही खूप उत्साही आहोत. ई कॉमर्स सोल्युशन्सचे ४ मार्ग पुरवताना आम्हाला आनंद होत असून सिंगल चेकआउट लिंकद्वारे विक्रेत्यांचे काम अधिक सोपे व झटपट होईल. आगळ्या-वेगळ्या आणि प्रासंगिक ई कॉमर्स सोल्युशन्सद्वारे विक्रेत्यांना पाठबळ देण्याची आमची नेहमीच धडपड असते. त्यामुळे ही नवी सुविधा या क्षेत्रात क्रांतिकारी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

विविध प्रकारच्या मार्केटप्लेसमध्ये (अॅमेझॉन, लझाडा, शॉपी, Qoo१० इत्यादी) विक्री करण्याची इच्छा असलेल्या विक्रेत्यांसाठी शॉपमॅटिकच्या मार्केट प्लेस सोल्युशनद्वारे विक्री, व्यवस्थापन व त्यांच्या व्यवसायिक प्रक्रिया शॉपमॅटिकच्या डॅशबोर्डद्वारे करण्याची परवानगी दिली जाते. प्रत्येक मार्केटप्लेसच्या डॅशबोर्डमध्ये उत्पादने अपलोड करण्याऐवजी शॉपमॅटिक मर्चंट्स सर्व प्रमुख प्रक्रिया शॉपमॅटिकच्या डॅशबोर्डद्वारे पार पाडू शकतील. त्यामुळे प्रत्येक मार्केटप्लेस डॅशबोर्डचे व्यवस्थापन करण्याचे काम अधिक सोपे होईल.

जे विक्रेते व व्यावसायिकांना त्यांचे वेबस्टोअर तयार करायचे आहे, त्यांना शॉपमॅटिक मदत करेल. यासाठी त्यांची पॉवरफुल इकोसिस्टिम, पेमेंट, शिपिंग इंटिग्रेशन्स, चॅट आणि सोशल सेलिंग, विविध सुंदर टेमप्लेट्स, डोमेन नेम इत्यादींसारख्या सर्व सुविधा शॉपमॅटिकद्वारे पुरवल्या जातील.