मुंबई: स्मार्ट फोन क्षेत्रात यशस्वीरित्या प्रवेश केल्यानंतर ट्रान्शन ग्रुपचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड असलेल्या इन्फिनिक्सने बहुप्रतिक्षित स्मार्ट टीव्हीची सिरीज लाँचसाठी सज्ज केली आहे. ‘इन्फिनिक्स एक्स१’ असे तिचे नाव आहे. हे अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही ३२ इंच व ४३ इंच प्रकारात येतात. हे टीयूव्ही राइनलँड प्रमाणित उपकरण असून त्यात ब्लू लाइट वेव्हलेंथवर नियंत्रण ठेवले जाते. जेणेकरून टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. १८ डिसेंबर पासून ही उपकरणे फ्लिपकार्टवर अनुक्रमे ११,९९९ (३२ इंच) आणि १९,९९९ (४३ इंच) रुपये किंमतीत उपलब्ध आहेत.
‘इन्फिनिक्स एक्स१’ सिरीज टीव्हीमध्ये सुपर नॅरो बेझल असून याद्वारे टीव्हीला दर्जेदार लुक येतो. तसेच पाहण्याच्या उत्कृष्ट अनुभवासाठी सर्वोच्च स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर प्रदान केले जाते. एपिक 2.0 इमेज इंजिन तुमची एकूणच पिक्चर क्वालिटी वाढवण्यासाठी अल्गोरिदमचा वापर करते. हुबेहुब पिक्चर क्वालिटी देण्याकरिता तसेच ब्राइटनेस, रंग, कॉन्ट्रास्ट, स्पष्टपणा वाढवून मिळतो.
इनफिनिक्स एक्स१ सीरीज टीव्ही इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्ससह येतो. याद्वारे सर्वोच्च बेस इफेक्टसह उत्कृष्ट ध्वनीचा अनुभव येतो. २४ व्हॉट्स बॉक्स स्पीकर्सपर्यंत डॉल्बी ऑडिओचे हे मिश्रण असून, याद्वारे समृद्ध, स्पष्ट, शक्तीशाली असा सभोवतालच्या वातावरणाचा ध्वनी ऐकू येतो. या सिरीजमधील दोन्ही अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही पॉवरफुल मिडियाटेक क्वाड कोर प्रोसेसरसोबत तसेच १ जीबी रॅम आणि ८ जीबी रोमसह येतात.
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, युट्यूब इत्यादी आवडत्या व्हिडिओ अॅपसोबत अखंड कनेक्ट ठेवण्यासाठी इन्फिनिक्स स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट सुविधा येते. याद्वारे पर्सनलाइज्ड आणि हँड्स-फ्री अनुभवाकरिता गुगल असिस्टन्सदेखील कनेक्ट होते.
इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ श्री अनिश कपूर म्हणाले, “कोव्हिड-१९च्या काळापासून स्क्रीन पाहण्याच्या वेळात लक्षणीय वाढ झाली असल्याने इन्फिनिक्सने तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर काम करण्याचे ठरवले. ग्राहकांनी दिलेल्या किंमतीचे उत्कृष्ट मूल्य प्रदान करणे हे आमचे प्रमुख तत्त्व पाळत आम्हाला नव्याने लाँच झालेल्या स्मार्ट टीव्ही सीरीजचा वेगळाच ठसा उमटवायचा आहे.”