नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं दर ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल २९ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ३ लाख ८ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल २१ हजार १५३ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटीचा आकडा पार करत १ कोटी ४ हजार ५९९ पोचली.

काल ३४७ रुग्णांचा मृत्यू झाला, देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १ लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काल ११ लाख ७१ हजार ८६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ९० हजार ५१४ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.