नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालु खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. या हंगामात सरकारनं महाराष्ट्रासह १६ राज्यांमधून हमीभावानुसार ७७ हजार ६०८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

सरकारनं आत्तापर्यंत खरेदी केलेल्या भातापैकी ४९ टक्क्याहून अधिक म्हणजेच २०२ लाख टनाहून अधिक भात खरेदी पंजाब मधून केली असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.