मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८१ हजार ८४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतकं झालं आहे.
काल ३ हजार ९४० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९२ हजार ७०७ झाली आहे. सध्या राज्यात ६१ हजार ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ६४८ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे.