सोलापूर : दिव्यांगांच्या (अपंग) विविध समस्यांवर आणि इतर प्रश्नांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अनिरुध्द कांबळे यांच्या सोबत चर्चा करुन, विविध मागण्याचे निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ धेडे यांनी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना असताना देखील त्यांची अंमलबजावाणी होता नाही, असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षासमोर उपस्थित केला.
ग्रामपंचयतीमध्ये दिव्यांगाना विविध योजनांसाठी 5 टक्के निधी असतानासुध्दा, तो ग्रामपंचायतीकडून वेळेवर दिला जात नाही. दिव्यांगाना 50 टक्के घरपट्टी व पाणी पट्टी माफ करावी. दिव्यांगाची कर्ज प्रकारणे तातडीने मंजूर करण्याच्या सूचना बँकाना द्याव्यात. समाजकल्याण पुनर्वसन व मार्गदर्शन कक्ष प्रत्येक तालुकास्तरांवर, पंचायत समितीमध्ये स्थापन करण्यात यावा. अपंगसाठी उपयोगी साहित्य वाटप व इतर मागण्या, यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे यांनी कोरोना महामारीचे संकट संपुष्टात आल्यानंतर, दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करु असे आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शी तालुका अध्यक्ष व विरोधी पक्षनेते मा.पांडुरंग जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैरग विभाग अध्यक्ष मा.राहुल डिसले, सोलापूर प्रहार क्रांती आंदोलन उपअध्यक्ष मा.विजय पुरी, उत्तर तालुका अध्यक्ष मा.रमेश लोखंडे, सोपान पुर्ती सबुक दिव्यांग संस्था सचिव मा.कविता करडे आदी उपस्थिती होते.