मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला कांजूर मेट्रो कारशेडचा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या चर्चेतून सुटू शकतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.काल सामाजिक संपर्क माध्यमांतून राज्यातल्या जनतेशी बोलत होते.राज्याच्या निर्णया विरोधात केंद्र सरकार न्यायालयात गेले असल्याचे सांगत दोघांनी एकत्रित बसून हा वाद सोडवणे आवश्यक आहे.विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. याचे त्यांना श्रेय द्यायला आपण तयार असून, हा जनतेच्या हिताचा प्रश्न असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्याच्या विकास प्रकल्पांमध्ये केंद्राकडून अडवणुकीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा आपल्या पक्षाचा स्वभाव नसल्याचं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं.