नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या घसरणीचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारातही दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार ४०७ अंकांनी कोसळला, आणि ४५ हजार ५५४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही आझ ४३२ अंकांनी घसरण झाली आणि तो १३ हजार ३२८ अंकांवर बंद झाला.