पुणे: कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झालं आहे. केंद्राच्या निर्देशानुसार सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेनं यापुढे जावून कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकाऱ्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे.