पुणे – कोविड -19 च्या रुग्णांकरीता सीएसआर फंडामधून करण्यात आलेल्या कामांचा व त्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. विधानभवन,पुणे या ठिकाणी होणार आहे.
कोविड – 19 च्या संसर्गबाधित रुग्णांकरीता राज्य शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यापैकी पुणे जिल्हयामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांकरीता ॲक्सीस बँक,बंधन बॅक व एच.डी.एफ.सी बँकेमार्फत सामाजिक जबाबदारीचा वाटा लक्षात घेवून त्यांच्या सीएसआर फंडामधून काही साधनसाम्रगीचा पुरवठा करण्यात आला.
यामध्ये ॲक्सीस बँकेमार्फत स्वच्छ भारत अभियान व कोविड-19 महामारी नियंत्रण कार्याच्या देखरेखीसाठी पीएमसी टास्क ॲप, बंधन बँकेमार्फत दळवी रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन प्रणाली व 98 ऑक्सिजन पाँईट, ससून रुग्णालयातील 4 डयुरा सिलेंडर व वॅपोरायझर मशिन, टिव्ही सेट सहित कोविड एडयुटमेंट प्रणाली -16, कोविड एडयुटमेंट प्रणाली-151 तसेच एसडीएफसी बँकेमार्फत लायगुडे रुग्णालयातील मेडीकल ऑक्सिजन प्लान्ट-2 करीता एचएएल क्लाऊड क्लिनिक मशिन – 20 (स्वयंचलीत 33 चाचण्यांसाठी ), संगणक संच व प्रिंटर -15, ए 1 कोविड डिटेक्शन- पोर्टेबल एक्स रे मशीन आणि एसी -26,000 चाचण्या, ईसीजी मशीन -28, कार्डियाक रुग्णवाहिका -1, हर्से व्हॅन-1, नेगेटिव आयन जनरेटर ( ॲन्टी बॅक्टेरिया आणि ॲन्टी व्हायरस)-226, पोर्टेबल एक्स-रे मशीन आणि डिजीस्टर (28) त्याचप्रमाणे पुणे शहरासाठी फिरता दवाखाना व मोफत औषधे व मधुमेह तपासणी -6 इ. साधनसामग्रीचा लोकार्पण होणार आहे.
यावेळी जिल्हयातील सर्व खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.