नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. एका कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

१ जानेवारी 2021 पासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असेल. यामुळं प्रवाशांना पथकर नाक्यांवर शुल्क देण्यासाठी थांबावं लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल, असं त्यांनी सांगितलं.