नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा, ब्रिटनमधल्या आर्थिक आणि व्यापार संशोधन केंद्र सीईआरबीनं केला आहे. सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद केली आहे. पाचव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था, चालू आर्थिक वर्षात रुपया कमजोर झाल्यानं, ब्रिटनच्या मागे पडली.
मात्र पुढच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९ टक्के वाढ होईल, २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगात पाचवी, २०२७ मध्ये जर्मनीला मागे टाकत चौथी, तर २०३० मध्ये जपानला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असं या अहवालात म्हटलं आहे.