नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा, फळं-फुलं, भाजीपाला, तसंच दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारावर किमान हमी भाव द्यावा, केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संवैधानिक दर्जा द्यावा, आदी मागण्या हजारे यांनी केल्या आहेत.
या मागण्यांवर गेली तीन वर्ष आश्वासनं आणि चर्चा झाल्या, आता ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं हजारे यांनी या पत्रकात म्हटलं आहे.