नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक गंभीर असू शकतो, त्यामुळं त्याचा सामना करण्यासाठी आपण एकत्रित येणं आवश्यक आहे, असं या संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी सांगितलं.
संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनीही जगाला इशारा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत, त्यामुळं आजारी पडणाऱ्या लोकांबाबत आणि सध्याच्या लशीकरण कार्यक्रमावर त्याच्या होणाऱ्या परिणामाबाबत रोज नव्यानं माहिती समजत आहे.
या संदर्भात ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून त्या आधारावर जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाची पुढील दिशा ठरेल, असं घेब्रेयेसूस यांनी सांगितलं.