नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकारक असणार आहे.

यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर थांबावं लागणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन,१ डिसेंबर २०१७ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना देखिल फास्टटॅग अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं.

आतापर्यंत दोन कोटी २० लाखहून अधिक फास्टटॅग जारी केले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यावर,तसेच ३ हजारांहून अधिक अन्य ठिकाणी फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे.त्याचबरोबर ॲमेझॉन,फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही फास्टटॅग खरेदी करता येतील.