नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीवर आधारित केलेल्या भाताच्या खरेदीमुळे देशातल्या ६० लाख ६७ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ९० हजार ५०२ कोटी रुपयांहून जास्त नफा झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे.
यंदाच्या हंगामात महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगड, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओदिशा , मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून अंदाजे ४८० लाख टन भाताची खरेदी केल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.
मूल्य समर्थन योजने अंतर्गत सरकारनं महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा , राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधून ५१ लाख टनापेक्षा जास्त डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे, तर २१ हजार कोटी रुपयांपेक्षा किमतीच्या ७३ लाखाहून जास्त कपाशीच्या गाठी खरेदी केल्या असून त्याद्वारे १४ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.